मोठी बातमी | गडचिरोली जिल्ह्यात इंद्रावती नदीमध्ये बुडाली बोट…१३ जणांना वाचवले तर दोघे बेपत्ता…

गडचिरोली – मिलिंद खोंड

गडचिरोली जिल्ह्यातील इंद्रवती नदीमध्ये नाव बुडाल्यानं मोठी दुर्घटना घडली असून मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेतून 13 जणांना वाचवण्यात यश आलं आहे तर दोघे जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. सिरोंचा तालुक्यात सोमनपल्ली भागातून छत्तीसगड इथे एका कार्यक्रमासाठी दोन नाव घेऊन काही जण निघाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही नाव संध्याकाळी 7 च्या सुमारास छत्तीसगड इथला कार्यक्रम करून पुन्हा येत असताना मंगळवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली आहे. दोन जण सुरुवातीला बाहेर पण तर या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. 13 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळालं आहे तर आणखीन तीन नागरिक बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. वन विभाग, ग्रामस्थ आणि पोलिसांकडून बेपत्ता असणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

दोन लहान नाव घेऊन काही लोक छत्तीगडमधील कार्यक्रमाला जात असताना ही दुर्घटना घडली आहे. नेमकी नाव कशामुळे उलटली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. नाव उलटल्यानंतर सुरुवाती दोन जण सुरक्षित बाहेर पडले तर तीन जण नदीमध्ये असलेल्या दगडाला घट्ट धरून बचावासाठी ओरडत होते.

रात्री उशिरा वन विभागाच्या टीमने बोटीच्या मदतीनं काही जणांना इंद्रावती नदीच्या पाण्यातून बाहेर काढलं आहे. अद्यापही पोलीस आणि वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here