गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; राज्याच्या टोकावर असलेल्या सिरोंचा ते कोरची पर्यंत जिल्हा करणार सुजलाम सुफलाम,पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती…

अहेरी येथील राजवाडा व आलापल्ली येथील कोविड सेन्टरला भेट.

अहेरी

राज्याचे नगर विकास ,सार्वजनिक बांधकाम मंत्री, तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे हे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर कोरोणाच्या प्रादुर्भावाने तात्पुरता पदभार राज्यमंत्री विजय वडेट्टीवार सोपविला होता. तब्बल सहा महिन्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात येऊन त्यांनी विविध विकास कामाचा योजनांचा आढावा.

घेतला यामध्ये जिल्ह्यात असलेला नक्षलवाद यासोबतच शिक्षण, रस्ते ,विज आरोग्य यावर अधिक भर देण्यात आला ज्या ठिकाणी निधीअभावी कामे प्रलंबित असतील अशा ठिकाणी निधीची पूर्तता करून कामे मार्गी लावणार आहे.

यासोबतच जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार निर्माण करण्यासंदर्भात अधिक भर दिला जाणार असून यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि विकासही होईल जिल्ह्यात पावलेला नक्षलवाद कमी करण्यासाठी विकास कामे होणे महत्त्वाचे असून त्यासाठी उद्योग निर्मिती लवकरच करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे.

बिंदु नामावली प्रमाणे भरती प्रक्रिया होत नसल्याने अभ्यास करू विविध पदाच्या पदभरती प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे बोलले आहे.जिल्ह्यात सर्वात आधी नक्षलवाद हद्दपार करायचा असेल तर शिक्षण आणि रोजगार निर्मिती करावी लागेल ग्रामीण भागामध्ये मोबाईल टावर निर्मितीवर भर देऊन रस्तेही गावापर्यंत जोडले गेले पाहिजे.

जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यापेक्षा कोरोना प्रादुर्भाव संसर्ग होण्यापासून रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.. कोरोना सी .आर .पी .एफ, एस आर .पी .एफ जवानाशिवाय काही कामगार यांना प्रादुर्भाव झाला आहे. विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे यश आले आहे

गडचिरोली जिल्ह्यच्या दौऱ्यावर
मंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजन भवन गडचिरोली या ठिकाणी आढावा बैठक घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोविड सेंटरला भेट दिली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राज्याच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्याला भेट देऊन ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली

या सोबतच पात्तागुडम येथील गोदावरी नदीवरील पूल पाहणी केली अनेक नागरिक याचे प्रश्न समजून निवेदन स्वीकारले अहेरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान धर्मराव बाबा आत्राम यांची अहेरी येथील राजवाडा येथे भेट घेऊन तालुक्यातील आलापल्ली येथील नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कोविड सेंटरची पाहणीकेली.

त्यानंतर पोलीस उपमुख्यालय प्राणहिता अहेरी वरून गडचिरोली प्रस्थान झाले आणि गडचिरोली येथील प्रशासनाला सूचना करून मुंबईला रवाना झाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here