राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे फळ व बिस्किट वाटप कार्यक्रम संपन्न…

मुर्तीजापुर – राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे, जिल्हाध्यक्ष संग्राम भय्या गावंडे,ज्येष्ठ सहकार नेते मा.आ.भय्यासाहेब तिडके, आमदारअमोल मिटकरी मा.आ.तुकाराम बिडकर, मा.आ.हरिदास भदे, मा.आ.बळीराम सिरस्कार प्रदेश संघटक सचिव रवी राठी, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, सुषमा कावरे यांचे मार्गदर्शनात राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष विष्णू लोडम,

दिपाली देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या तथा प्रवक्ता डॉ. आशाताई मिरगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांकरिता फळ व बिस्किट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मीबाई देशमुख यांच्या प्रतिमेला हारार्पण करून त्यानंतर रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना फळ बिस्किट वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ.रामकृष्ण गावंडे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.विलास सोनोने,डॉ.राजेन्द्र नेमाडे, डाॅ. वर्षा नेमाडे, तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर शहराध्यक्ष राम कोरडे,श्याम कोल्हाळे,विशाल शिरभाते,आनंद पवार,सुवर्णा सपकाळ,सुनिता लोडम,रंजना सदार वर्षा कावरे,अतुल गावंडे,मयूर जाधव, इत्यादी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here