सांगली – ज्योती मोरे
शिवपुत्र ग्रुप तर्फे आज सांगली काेल्हापुर राेड अंकली फाटा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत असल्याने प्रतिमा वाटप करण्यात आल्या. फेब्रुवारी महिना म्हणजे १९ फेब्रुवारी हा शिवनेरी मास असे संबोधन करून शिवपुत्र ग्रुप यांच्या वतीने विविध कार्यक्रम अयाेजीत केले असून या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शन म्हणुन संगीताताई पाटील,शिवभक्त लक्षदीप कुंभार,
आदरणीय बळवंत पाटील,आयोजक स्वप्निजीत पाटील , तानाजी पाटील,पवार साहेब,ओम भाेसले पाटील,अथर्वराज पाटील, कुणाला पवार, सुधाकर खाेत, कृष्णा माळी,शिव मावळे यांना सलग ७ दिवस प्रतीमा वाटप विविध कार्यक्रम शिवपुत्र ग्रुप यांच्या वतीने सुरू आहेत.तसेच सात दिवस विविध उपक्रम हे शिवपुत्र ग्रुपच्या वतीने राबविण्यात येणार आहेत.