कडबी बाजार परिसरात मानवी हस्तक्षेपामुळे होतो वारंवार वीज पुरवठा खंडित…

पंतग,चीनी मांजा मुळे विज पुरवठा खंडित…
प्रत्यक्ष पाहणीनंतर मुख्य अभियंताचे नागरीकांना सहकार्याचे आवाहन…

अमरावती – महावितरणच्या कडबी बाजार वितरण केंद्र व आजूबाजूच्या परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याला तांत्रिक दोष कारणीभूत नसून मानवी हस्तक्षेपामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले आहे. महावितरण वीज ग्राहकांना सुरळीत सेवा देण्यासाठी बांधिल आहे परंतू नागरीकांनीही सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी केले आहे.    

वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी संपूर्ण शहरभर आवशकतेनुसार उच्चदाब व कमी दाबाच्या वीज वाहिन्या, रोहित्रे,वीजखांबे उभारण्यात आलेली आहेत.एका वीज वाहिनीवर हजारो ग्राहक असल्याने एखाद्या ठिकाणी जरी फॉल्ट झाला तरी याचा फटका त्या वाहिनीवरील सर्व ग्राहकांना बसतो. 

कडबी बाजार व परिसरात वीज पुरवठा करतांना चिनी मांजे व पंतंगे ही महत्वाचा अडथळा ठरत आहे.वीज वाहिन्यां,रोहित्रे आणि वीजखांबावर पंतंगे अडकल्याने तसेच मांज्या वीजवाहिन्यांमधे गुंतल्यामुळे वीज वाहिन्या एकामेकाला लागुन फॉल्ट होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी अडकलेला पंतग व मांजा काढण्यासाठी त्या संपूर्ण वीज वाहिनीचा वीज पुरवठा बंद करावा लागतो.

शिवाय पंतंग व माज्यामुळे होणारे फॉल्ट शोधणे अत्यंत जिकीरीचे आहे. मांजा व पतंगे ही वीज वाहिन्यांचे दोन्ही खांबाच्या मधोमध अडकले असेल तर त्या ठिकाणावरील मांजा काढणे कठीण जाते. चिनी मांजा एकदम पक्का असल्याने तुटलेला मांजा ओढतांना वीज वाहिन्या एकामेकाला लागुन प्रसंगी मोठा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

याशिवाय ११ केव्ही  उच्चदाबाच्या वीज वाहिनींपासून सुरक्षीत अंतर न ठेवता अनेक नागरीकांनी आपली घरे बांधली आहे.नंतर सुरक्षेचा उपाय म्हणून स्वत: नागरीकच बांबूने ११ केव्ही वीज वाहिन्यांना घरापासून दूर करण्याचे काम करतात यामुळेही अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याचे निदर्शनास आले आहे.  विजेचा अनाधिकृत वापरामुळेही रोहिञे अतिभारीत होवून  वीज पुरवठा खंडित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

याशिवाय महापालिका,जीवन प्राधिकरण,सार्वजनिक बांधकामाच्या अनुक्रमे  रस्ता रूंदीकरण, पाइपलाईनचे  काम सुरू असल्याने  जेसीबी मशीनमुळे काही ठिकाणी महावितरणची भूमीगत वाहिनी तुटल्यानेही वीज पुरवठा खंडित झाला आहे.त्यामुळे संभाव्य दुष्परिणाम बघता पंतग उडवितांना ती वीज वाहिन्यांपासून दूर मोकळ्या मैदानातच उडवावी,सुरक्षेचा उपाय म्हणून घराला लागून गेलेल्या वीज वाहिन्यांना कोणीही लाकडी टेका देऊ नये तसेच  विजेचा अनाधिकृत वापर टाळण्याचे आवाहन मुख्य अभियंता यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here