लग्नाचे आमिष दाखवून युवती वर वारंवार शारीरिक शोषण, बलात्काराचा गुन्हा दाखल…

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील चिखलगाव येथील एका युवती ला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक शोषण करण्यात आले असून निंबी मालोकार येथील नागेश उर्फ नागोराव शंकर राऊत याचे विरुद्ध विविध कलमा प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपी नागेश राऊत हा अद्याप पातूर पोलिसांना गवसला नाही सविस्तर वृत्त असे कि,

चिखलगाव येथील युवती हि पातूर येथील सिन्हा कॉलेज मध्ये शिक्षण घेत असतांना तेथे तिची ओळख निंबी मालोकर येथील नागेश राऊत याच्या सोबत झाली ओळखीचा फायदा घेत नागेश याने वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेवून जबरदस्ती ने शारीरिक संबंध प्रस्थापित करून नग्न फोटो काढून ते फोटो व्हायरल करण्याचि धमकी देत सदर युवती ला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन नागेश राऊत याने तिच्याशी संबंध प्रस्थापित करून सदर घटना कुणाला सांगितल्यास जिवाने मारण्याची धमकी दिली,

सदर घटनेला कंटाळून या युवतीने नागेश राऊत याच्या विरुद्ध पातूर पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपी नागेश राऊत विरुद्ध अप. क्रमांक 547,376, (2)(9)504,506 भादवी सहकलम 3(1)(w)(i)(ii)3(2)(v)3(va)अ जा ज अ प्र का 1989 सुधारित कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वृत्त लिहेस्टोवर आरोपीस अटक करण्यात आली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here