Friday, June 14, 2024
spot_img
Homeग्रामीणभोजापुर येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न...

भोजापुर येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न…

राजु कापसे
रामटेक

दिनांक:- १० मे २०२४ रोजी,भोजापुर,ता.रामटेक येथे “आपला आमदार आपल्या सेवी अभियान” अंतर्गत
अ‍ॅड.आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप भोजापुर येथे आयोजित करण्यात आले होते.

साई व्हिजन केअर रामटेक हॉस्पिटल येथिल तज्ञ डाॅक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली.
या शिबिरात एकूण-१६२ लाभार्थीनी लाभ घेतला. यामध्ये मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-२८, व चष्मे करिता-१३४ लाभार्थी यांनी लाभ घेतला..
या कार्यक्रम प्रसंगी

सरपंच संदीप सावरकर,उपसरपंच भारत अडकणे,भारती आष्टनकर,विनोद वडान्द्रे, देवा वडान्द्रे,राजेश मेंघरे,कैलास आष्टनकर,अरविंद मेंघरे, नेहाल आष्टनकर, सागर टिपले,सुमित कामडे व तसेच समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आमदार आशिष जयस्वाल यांनी “आपला आमदार आपल्या सेवी” अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: