पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिरजमध्ये मोफत आरोग्य शिबीर संपन्न…

सांगली – ज्योती मोरे.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पूर्व मंडल आयोजित आरोग्य तपासणी शिबिर देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगलीमध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वाढदिवसानंतर सेवा व समर्पण अंतर्गत आज मिरजेतील ब्राह्मणपुरी येथे भाजपा महिला मोर्चा, मिरज शहर आणि सेवा सदन हेल्थ प्लस यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व सेवासदन हेल्थ प्लस मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षा, नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरात मोफत सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये दंतरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, मधुमेह, पोट विकार आणि जनरल चेक अप अशी पूर्ण तपासणी करण्यात आली. या शिबिराला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना यावेळी स्वाती शिंदे म्हणाले की भाजपा पूर्व मंडलनी खूप चांगला उपक्रम राबविला असून या शिबिराचा लाभ बहुतांश नागरिकांना मिळाला आहे.

आज नागरिक स्वतःला विकार असून देखील तपासणी करण्यासाठी दवाखान्यात जात नाही अशावेळी जनजागृती करून त्यांची तपासणी करणे गरजेचे असते तरच पुढील उपचार वेळेवर मिळू शकतात. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा पूर्व मंडळाच्या अध्यक्षा रूपाली देसाई, अनघा कुलकर्णी, नम्रता साठे, माधुरी कापसे, सुप्रिया जोशी आदींनी केले होते. भाजपचे सरचिटणीस मोहन वाटवे यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, ज्योती कांबळे, सुजाता रक्तवान, शोभा गाडगीळ, रूपाली गाडवे, साधना माळी, अनिता हारगे, निकिता चव्हाण आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here