पिंपरी जिल्हा परिषद गटातील २०० कोरोना योद्ध्यांना बीसीजी मोफत लसीकरण…

राजगुरूनगर ( पुणे ) : राजगुरूनगर येथील जिल्हा परिषद निधीतून करंजविहीरे व पाईट प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या प्रयत्नातून १२ हजार ज्येष्ठ नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती गोळ्या तसेच सुमारे २०० कोरोना योद्ध्यांना रोगप्रतिकारक बीसीजी लसीचे लसीकरण करण्यात आले.

पुणे जिल्हा परिषदेच्या निधीतून सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी आरोग्यविषयक वैयक्तिक संरक्षक साधनांपेक्षा कोरोनाचा कहर पाहता नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी रोगप्रतिकारक गोळ्यांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी३ पावडर, व्हिटॅमिन सी, झिंक व आयर्न फॉलिक या चार आवश्यक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

या गोळ्यांच्या पाकिटांचे मतदारसंघातील गावनिहाय नियोजन करून आशा वर्करनी सुमारे १२ हजार नागरिकांना गावोगावी जाऊन प्रत्यक्ष वाटप केले.’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हा शासकीय उपक्रम गावोगावी खेडोपाडी राबविला जात आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी,ग्रामसेवक,सरपंच, ग्रा.पं. सदस्य,पोलीस पाटील,आशा वर्कर, शिक्षक व स्वयंसेवकांच्या माध्यमातून गावांमध्ये सर्व्हे लोकांची तपासणी केली जात आहे.

नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सीमिटरचे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना करंजविहीरे व पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वाटप करण्यात आले.तसेच आरोग्य कर्मचारी,पोलीस पाटील, सरपंच,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अशा सुमारे २०० करोना योद्ध्यांना मोफत रोगप्रतिकारक लस देण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर,वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री महाजन, डॉ.गिरीश उभे, डॉ. स्वाती कराळे, करंजविहीरेच्या सरपंच उज्वला खे़गले, पाईटच्या सरपंच मंगल भांगे, भाऊ देशमुख, नवनाथ डांगले, आरोग्य कर्मचारी, व आशा वर्कर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here