फेसबुकवर अनोखळी व्यक्तीच्या मॅसेजने ३७,५५,००० रुपयांची फसवणूक…

प्रतिनिधी; राहुल मेस्त्री…
मित्रहो सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्याने अनेक जण व्हाट्सअप ,फेसबुक ,इंस्टाग्राम यासारख्या साइट्सवर प्रमाणापेक्षा जास्त व्यस्त असतात. पण आपण एकाद्या अनोखळी व्यक्तिशी मॅसेज करत असाल तर सावधान.. कारण तुमची आर्थिक हानी होऊ शकते हे नाकारता येत नाही.. असाच प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे घडला असुन 37,55,000 रुपयांची फसवणूक झाली आहे..

याबाबत अधिक माहिती अशी की सतिश सकाराम निकम रा.शाहू नगर कागल.. यांची फ्रँक जँकसन या व्यक्तीने फेसबुकच्या मँसेंजरवर ओळख करून घेतली.. व भरत निकम या नावाचे युनायटेड किंगडम येथील रहिवासी असुन त्यांचे 2014 साली मयत झाले आहे…आणि त्यांचे Barclays बँकेत ५ कोटीचा फंड असुन त्यांच्या नातेवाईकांना फंड देण्यासाठी बॅक नातेवाईकांना शोधत असल्याचे सांगितले..बँकेचा ईमेल आयडी सतिश निकम यांना दिला..

व त्याना भरत निकम यांचे नावाचे खोटे कागदपत्रे देऊन …ती बॅके ईमेलने सादर करण्यास सांगितले.. व सतिश निकम यांचा विश्वास संपादन करण्यासाठी Barclays बँकेचे एटीएम कुरिअरने पाठवुन.. त्यावर फिर्यादीदार सतिश निकम यांना पैस काढण्यास सांगितले .. असाच विश्वास संपादन करुन वेळोवेळी एटीएम अँक्टीवेशन चार्जेस , इन्सुरन्स पॉलिशी कव्हर साठी फि , युनायटेड नेशन ऑफ इंडियाची फि व इंटरनॅशनल मॅडेटरी फंडची फि असे मिळुन फिर्यादीकडुन पैसे घेतले

व फिर्यादी यांना पुन्हा बँकेचे पत्र कुरिअरने पाठवुन १ कोटी फंड सिक्युरिटी फि साठी कुरिअरने पत्र पाठविले..यानंतर फिर्यादीदार सतिश निकम यांना आपली फसवणुक होत असल्याचे लक्षात आल्याने… याबाबत त्यांनी आपल्या पत्नीशी चर्चा करुन दि.29रोजी कागल पोलीस ठाणेत समक्ष हजर राहुन तक्रार दिल्यावर भारतीय दंड वि.स.कलम 419,420 माहिती तत्रज्ञान अधिनियम क्र.66 सी ,66 डी,r/w 43 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ….तर ही सर्व फसवणूक दि. 6 जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 अखेर फिर्यादीच्या मोबाइलवरून त्यांच्या घरी झाली..तर यामध्ये 37,55,000₹याची फसवणूक झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here