अमरावती | भरवस्तीतून चार वर्षीय नयन लूनियाचे अपहरण…शहरात खळबळ

न्यूज डेस्क – आजी व लहान बहिणीसोबत खेळत असताना स्थानिक शारदा नगर येथे निवासस्थनासमोरून चार वर्षीय नयन मुकेश लुनिया याचे बुधवार रात्री आठ ला भर वस्तीतून अपहरण करण्यात आले.

दुचाकीवर आलेली एक महिला व युवकाने अतिशय सूत्रबद्ध रित्या हे अपहरण केल्याचे सीसीटिव्ही फुटेज मध्ये समोर आले.नयन चे वडील मुकेश यांचे सायकल पार्ट तसेच ई सायकल चा मोठा व्यवसाय असून याच भागात त्यांचे मोठे दुकान आहे.

चिमुकल्या नयन च्या शोधकरिता पोलिसांनी पथकाचे गठण केले असून अद्याप कुठलही सुगावा लागला नाही.रात्रीच्या सुमारास पोलीस आयुक्त आरती सिंह सहित अन्य अधिकारी नी घटनास्थळी जावून माहिती घेतली.तसेच आ रवी राणा,सुनील देशमुख सह अनेकांनी लूनीया परिवाराची भेट घेतली.

भरवस्तितून झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here