पालघर जिल्ह्यातील चार ग्रामसेवक निलंबित,मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कारवाई…

पालघर,

अंगणवाडी इमारतीचे बांधकाम विहित मुदतीत पूर्ण न केल्याने व बांधकाम निधी मध्ये अपहार केल्याचे निदर्शनास आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.पालघर सिद्धाराम सालीमठ यांनी तीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

तर अनेक कामात अनियमितता करून आपल्या कर्तव्यात कर्तव्य पारायणता व सचोटी न ठेवता कामकाजात अक्षम्य दुर्लक्ष केल्याने एका ग्रामसेवकास निलंबित केलेले आहे.बिपिन जाधव असे या ग्रामसेवकाचे नाव असून मनोज प्रजापत, ग्रामपंचायत केव ता.विक्रमगड, कृष्णा शिंदा, ग्रामपंचायत तलवाडा,ता.विक्रमगड, राजू डोंगरकर ग्रामपंचायत जांभा, ता.विक्रमगड येथे कार्यरत असणाऱ्या सदर ग्रामसेवकांना निलंबित केले आहे.

अंगणवाडी इमारतीचा निधी प्राप्त असताना ही मुदतीती काम पूर्ण न केल्याने तसेच खर्च दाखवून त्या खर्चाच्या बदल्यात कोणतेही काम न करता व्यवहाराचा अपहार केल्याने सदर ग्रामसेवकांनी महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा( वर्तणूक ) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषदा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ३ नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिकारानुसार मु.का.अ.यांनी १५/१/२०२१ निलंबनाची कारवाई केली.

तर वसुरी ता. विक्रमगड येथील दप्तर तपासणी करुन सादर केलेल्या चौकशी अहवालानुसार बिपिन महादेव जाधव. ग्राम विकास अधिकारी यांनी लेखा परिक्षण मुद्दयांची पुर्तता मुदतीत न करणे, जनसुविधा योजना, १४ वा वित्त आयोग, ५% अवंध निरध यामधून विकास कामे व साहित्यखरेदी करताना दरपत्रक/निविदा/ ई-निविदा प्रणालीचा अवलंब न करणे.

टी.सी.एल.खरेदीचा नोंद साठारजिष्टरला न घेणे, बोरसे पाडा अंगणवाडी दुरुस्ती करणे या कामावर अंदाजपत्रक व मुल्यांकन नसताना खर्च करणे, खरेदी करण्यात आलेल्या साहित्याची नोंद साठा रजिष्टरला न घेणे. विकास काम करताना ई निविदा न करणे, विकास काम करताना निर्माण झालेल्या मालमत्तेची नोंद मालमत्ता रजिष्टरला न घेणे, रक्कम रु.३७५४/- हा खर्च करताना कंशबुक,

प्रमाणक किंवा पावतीवर सदरचा खर्च कशासाठी करण्यांत आलेला आहे याची नोंद नसणे, कैशबुकावर सरपंच यांच्या स्वाक्षऱ्या नसणे. अशा प्रकारची अनियमितता केल्याचे निदर्शनास आल्याने बिपिन जाधव यांना ५/१/२०२१ रोजी निलंबित केले.

अशा कर्तव्यशून्य व बेजाजबदार कर्मचाऱ्यांना जरब बसावा व जिल्हा परिषदेच्या विकास कामांत अडथळा येऊ नये यासाठी ही कारवाई केल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here