विचित्र अपघातात अकोला येथील चार भाविकांचा मृत्यू…वैरागड घाटातील मोहाडी जवळील घटना…

फोटो सौजन्य गुगल

खामगाव-चिखली रोडवरील वैरागड घाटातील मोहाडी नजीक तीन वाहनांच्या विचित्र अपघातात अकोला येथील चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्व एकाच परिवारातील असल्याची माहिती मिळाली असून सदर घटना आज सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घडली. यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

अकोला येथील भाविक एमएच ३० एए २२५५ क्रमांकाच्या प्रवासी जीपने पंढरपूरकडे जात होते.दरम्यान, मोहाडी नजीक एका मालवाहू वाहनाने सुरूवातीला महावितरण कंपनीच्या प्रवासी गाडीला धडक दिली. त्यानंतर मालवाहू जीप अकोला येथील प्रवाशांच्या वाहनावर येऊन धडकून झालेल्या विचित्र अपघातात पंढरपूर येथे जाणारे चार भाविक जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले.

अपघातातील जखमी आणि मृतक सर्वजण अकोला येथील रहिवासी असल्याचे समजते.तर मालवाहू आणि महावितरणच्या वाहनातील प्रत्येकी एकजण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. अपघातील किरकोळ जखमी परस्पर खासगी रूग्णालयात गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

अपघातातील मृतांची नावेश्यामसुंदर रोकडे (५५)- चालकविश्वनाथ कराड (७२) शंकुतला कराड (६८) बाळकृष्ण खर्चे (७०)अपघातातील जखमींची नावे मुरलीधर रोहणकार सुलोचना रोहणकार उषा ठाकरे श्यामराव ठाकरे अलका खर्चे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here