मोटर सायकल चोरणार्‍या चौघांना अटक – स्थानिक गुन्हे अन्वेषण ची कारवाई…

सांगली – ज्योती मोरे

मिरज विभागात गस्त घालत असताना गुन्हे अन्वेषण शाखेचे कॉन्स्टेबल संजय कांबळे यांना खबऱ्याकडून अशी माहिती मिळाली की मिरज तालुक्यातील खटाव गावात महादेव नाईक ,प्रशांत नाईक व शंकर नाईक सर्व राहणार लक्ष्मी मंदिराजवळ खटाव यांनी मिरज सांगली, कराड येथून मोटारसायकली चोरून आणून त्या शंकर नाईक यांच्या राहत्या घराच्या मागे लावल्या आहेत.

त्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी खटाव गावात जाऊन संबंधित चोरांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी सदर गाड्या या सांगली, कराड, मिरज येथून चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून दोन लाख 70 हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

पुढील तपासासाठी या आरोपींना मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आली.

यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक विशाल केळेकर, सहाय्यक पोलीस फौजदार मारुती साळुंखे, संजय कांबळे, अमोल ऐदाळे, राजू शिरोळकर, संकेत मगदूम, विकास भोसले, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे आदींनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here