मूर्तिजापूर येथील पत्रकार स्व गणेश देशमुख हल्ला प्रकरणातील चार आरोपीना एका महीन्याचा सश्रम कारावास….

मूर्तिजापूर – २०१४ साली स्टेशन विभागातील राममंदिर परिसरात नाल्याला पुर आल्याने परीसराततील घरात पाणी शिरले होते याचे वृत्त संकलनासाठी गेलेले पत्रकार स्व.गणेश देशमुख,विलास नसले,सुधीर दुबे गेले असता

या परिसरातील शंकर यादव गणेश यादव श्याम यादव यांनी गणेश देशमुख यांना शिवीगाळ करुन मारहाण केली याप्रकरणी मुर्तीजापुर पोलीस स्टेशनला २९४,३२३,१४३,५०६ नुसार गुन्हा दाखल होउन प्रकरण न्याय प्रविष्ट होते,

यात दि, १०/६/२०२० श्रीमती जे.बी.गोयल न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी यांच्या आदेशाप्रमाणे शंकर यादव व इतर तीन आरोपींना एक महीना सक्षम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

स्व.गणेश देशमुख हे २०१८ ला मोटर सायकल अपघातात मृत्यू झाले आहेत,मात्र त्यांच्या मृत्यू नंतर ६ वर्षांनी शिक्षा झाल्याने गणेश च्या मृतात्म्यास शांती मिळाल्याचे त्यांच्या नातेवाईकाचे म्हणणे आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here