मूर्तिजापूर नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष भोलाशंकर गुप्ता अनंतात विलीन…


मूर्तिजापूर येथील प्रतिष्ठित नागरिक व नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष भोलाशंकर गुप्ता यांचे आज सकाळी नागपुरात उपचारादरम्यान निधन झाले,त्यांची अंतयात्रा सायंकाळी ५.३० मिनिटांनी निवास्थानावरून निघाली व मूर्तिजापूर बायपास स्मशान भूमीत त्यांच्यावर अंतसंस्कार करण्यात आला.

मूर्तिजापूर शहरातील व तालुक्यातील राजकीय क्षेत्रात त्यांचा चांगलाच दबदबा होता,भारिप बहुजन महासंघ आताची वंचित बहुजन आघाडी त्यांनी महत्वाची पदे भूषविली असून एड.प्रकाश आंबेडकर यांचे निकटवर्तीय होते.

त्यांनी मूर्तिजापूर नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदावर आपली चांगली कामगिरी बचावली होती, गेल्या काही महिन्यापासून गंग्रीन या आजाराने ग्रस्त असल्याने त्यांचावर नागपुरात उपचार सुरु होता आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्यांचा राजकीय वारसा त्यांचे सुपुत्र संजय गुप्ता हे संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष असून त्यांचा हि जिल्ह्यात सामजिक कार्यात महत्वाचे योगदान आहे, भोलाशंकर गुप्ता यांच्या निधनाची बातमी कळताच शहरात शोककळा पसरली आहे, त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here