महात्मा फुले महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन…

अहमदपूर – बालाजी तोरणे

अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ भारत भदाडे होते यावेळी वाचन प्रेरणा दिनानिमित्य ग्रंथपाल प्रा सदाशीव वरवटे यांनी संकल्प वाचन केले.

वाचन करताना मी स्वयं संकल्प करतो की, मी माझ्या व्यक्तिमत्व विकासासाठी, सकारात्मक प्रेरणेसाठी आणि ज्ञानप्राप्ती साठी नियमित वाचन करीन तसेच माझ्या परिवारातील सदस्यांना, मित्रांना, विद्यार्थ्याना देखील चांगले आयुष्य घडविण्यासाठी वाचन करण्यास प्रवृत्त करीन अशी स्वयं प्रतिज्ञा सकल्प करीत आहे आणि डॉ ए पी जे अब्दुल कलाम याचा आदर्श बाळगून कार्यरत राहीन असेही प्रतिज्ञाबद झाले.

वेळी कार्यक्रमास छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रा डॉ बी. आर. बोडके,रा.से.यो .कार्यक्रमाधिकारी प्रा बी. व्ही. आचार्य प्रा डी.एस कानवटे, प्रा पदमजा हगदळे ,प्रा बळीराम पवार, प्रा विरनाथ हुमनाबादे , कार्यालयीन अधिक्षक गोपाळ इंद्राळे, उद्धवराव जाधव ग्रंथालय परिचर इंद्रदेव पवार, किशन धरणे, आदि उपस्थितीत होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल प्रा सदाशीव वरवटे यांनी परिश्रम घेतले सुञ संचालन व आभार प्रदर्शन प्रा प्रभाकर स्वामी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here