संचमान्यता प्रस्ताव सादर करण्याचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन…

10 एप्रिल पंर्यंत शिक्षक आघाडी अमरावती येथे सादर करा-माजी आ.श्रीकांत देशपांडे

प्रतिनिधी अमरावती : राज्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी शाळा महाविद्यालयाच्या संच मान्यता ह्या सन 2013 पर्यंत आँफलाईन पध्दतीने केल्या जात होत्या.त्यावर शिक्षकांची व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची निर्धारणा होत होती.परंतु सन 2013 नंतर संच मान्यता ह्या आँनलाईन पध्दतीने होऊ लागल्या व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गोंदळ

निर्माण झाला बऱ्याच शाळा महाविद्यालयाच्या संच मान्यता चुकीच्या पध्दतीने तयार झाल्या.काही शाळाच्या संचमान्यतेमधे विद्यार्था संख्या कमी तर काही काही शाळाच्या संचमान्यतेमधे विद्यार्था संख्या जास्त त्यामुळे ज्या शाळेची संच मान्यतेमधे विद्यार्थी संख्या कमी आल्या अश्या शाळा महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी

तर काही शाळेतील मुख्याध्यापक अतिरीक्त झाले त्यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न सुध्दा समोर आला परंतु आता पर्यंत अशा शाळांच्या संचमान्यता दुरुस्त झाल्याच नाही.

अशा सर्व शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व लिपिक यांना या बातमी द्वारे अमरावती शिक्षक मतदार संघाचे माजी शिक्षक आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे यांनी आपले शाळेचे संचमान्यता दुरुस्तीचे प्रस्ताव शिक्षक आघाडी कार्यालय वाँलकट कंपाउंड अमरावती येथे दि.10 एप्रिल 2021 पर्यंत आनण्याचे आवाहन केले आहे अशी माहिती माध्यमांशी बोलतांना शिक्षक आघाडी विभागीय प्रसिद्धी प्रमुख रविंद्र सोळंके यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here