माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते विविध ठिकाणी आधारभूत धान खरेदी केंद्रांचे शुभारंभ…

कुऱ्हाडी (गोरेगाव) येथे आर्या अटल अभिनव सहकारी संस्थेच्या आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन संपन्न

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

आज कुऱ्हाडी (गोरेगाव) येथे आर्या अटल अभिनव सहकारी संस्था द्वारा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते संपन्न झाले. खरीप हंगाम २०२१-२२ मधील धान खरेदी केंद्र दिवाळी पुर्वी सुरू करुन शेतकर्‍यांच्या धानाची उचल करण्यात येईल या आश्वासनाची खासदार प्रफुल पटेल यांनी वचन पुर्ती करीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप धानाची विक्री करण्यास कोणतीही अडचण होवू नये तसेच व्यापाऱ्यांना कमी भावात धान विकावा लागु नये यासाठी पटेल हे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यास प्रयत्नशील होते.

खरीप हंगामातील धान खरेदी त्वरीत सुरु करण्यासाठी पटेल हे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात होते याकरिता राज्याच्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊन धान खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्घाटन प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या सोबत केवल बघेले, श्रीप्रकाश रहांगडाले, महेंद्र चौधरी, बाबा बोपचे, ऋषिपाल टेभरें, अलकाताई पारधी, अनिताताई तुरकर,

खुशाल वैदय, तिरेले ताई सरपंच, बिसेन सरपंच, सुनील कापसे, बबलू गौतम, प्रतीक पारधी,धनेश्वर तीरेले, केदार लांजेवार, बंटी पटले, हेमराज सोनवाने आनंद बडोले, अनिल सोनवाने, टेकचंद कटरे,धनेश्वर रहांगडाले, वायदभाई पठाण, भूपेन बघेले, देवराज कापसे,सहित मोठ्या संख्येने शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here