माजी आमदार डॉ जगन्नाथ ढोणे यांचे निधन…

पातूर येथे अंत्यसंस्कार : मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

पातूर – निशांत गवई

भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी आमदार डॉ जगन्नाथ ढोणे यांचे सोमवारी रात्री हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 66 वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी 12-30 वाजता पातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

डॉ. जगन्नाथ ढोणे हे विदर्भातील पाहिले ग्रास्टोस्कोपी सर्जन होते. स्वतंत्र विदर्भाच्या लढ्यात त्यांचे मोठे योगदान होते. महाराष्ट्र राज्य आरोग्य सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते. काही महिन्यापूर्वी त्यांनी कोरोनावर मात केली होती.

सोमवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा झटका आला. आणि त्यांचा मृत्यू झाला.पातूर येथील डॉ. वंदनताई जगन्नाथराराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय परिसरातील डॉ .वंदनाताई ढोणे स्मृती स्थळ येथे दि. 27 ऑकटोबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावन्डे, माजी राज्यमंत्री सुबोध सावजी, माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकडं, आ. राहुल पाटील, आ. हरिष पिंपळे, आ. नितीन देशमुख, माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार तुकाराम बिरकड, माजी आ. दाळु गुरुजी, आ. रणधीर सावरकर, आदींनी श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले.

यावेळी श्रद्धांजली सभेला राष्ट्रवादी कांग्रेस चे जिल्हाध्यक्ष संग्राम गावन्डे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात, समता परिषद चे विभागीय संघटक गजानन इंगळे, समता परिषद वाशीमचे जिल्हाध्यक्ष अरविंद गाभणे, गटनेते अजय ढोणे, किड्स पॅराडाईजचे अध्यक्ष गोपाल गाडगे,

नगरसेविका तुळसाबाई गाडगे, समता परिषदचे गजानन बारतासे, सचिन ढोणे, सागर कढोणे, चंद्रकांत बारतसे आदींसह राजकीय, सामाजिक नेत्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्रद्धांजली सभेचे संचालन धनंजय मिश्रा यांनी केले. अनेकांनी साश्रूपूर्ण नयनांनी श्रद्धांजली व्यक्त केली. नियमाचे पालन करत शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here