माजी मंत्री संजय राठोडांच्या अडचणी वाढणार?…पोस्टाने तक्रार देणारी महिला पोहोचली पोलीस ठाण्यात…Video

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ – शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे…त्यांच्या विरोधात पोस्टाने तक्रार देणारी महिला आज घाटंजी पोलीस ठाण्यात दाखल झाली. घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रारदार महिला एका कारने कुटुंबासह दाखल झाली. याबाबत SIT ने महिलेचा जबाब नोंदवला.

संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील सेवानगर येथील एका महिलेने घाटंजी पोलिस व पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्र पाठविले.

त्यात महिलेने आमदार संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले. आज जबाब नोंदविण्यासाठी महिला घाटंजी पोलीस ठाण्यात पोहोचली. विशेष तपास पथकाने बंदद्वार दोन तास महिलेची चौकशी केली….

यावर काल यवतमाळमध्ये पत्रकार परिषदेत घेत राठोड यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता, मात्र विरोधीपक्षांनी अधिवेशन चालू न देण्याची भूमिका घेतल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं होतं….

यवतमाळ जिल्ह्यातील ताज्या बातम्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप सामील होण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here