माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोपांवर केला खुलासा…थेट परमबीर सिंह यांच्यावर साधला निशाना…Video

फोटो - video स्क्रीन शॉट

शरद नागदेवे

नागपूर – परमबीर सिंह, सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या बिनबुडाच्या आरोपांनंतर ईडी, सीबीआयकडून सुरू असलेल्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य केले. मला पाठवलेल्या समन्सलाही मी लेखी स्वरूपात उत्तर देत आलो. मा. उच्च न्यायालयाने मला सांविधानिक हक्कांतर्गत विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

तरीही मी आज ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर राहून पुढील चौकशीस सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह गेले ४ महिने बेपत्ता आहेत, यातूनच त्यांच्या आरोपांतील खोटारडेपणा समजतो आहे. त्यांच्यावरही अनेकांनी गंभीर आरोप केले आहेत. याचाही विचार व्हायला हवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here