बिहारचे माजी राज्यपाल यांनी परमपूज्य परमात्मराज महाराज यांची घेतली भेट…

राहुल मेस्त्री – शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्त्व व त्रिपुरा व बिहार राज्याचे माजी राज्यपाल पद्मश्री डाॅ.डी.वाय्.पाटील यांनी दि. 11 रोजी आडी ता.निपाणी येथील श्रीदत्त देवस्थान येथे येऊन परमपूज्य परमात्मराज महाराज यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे दीडतास चर्चा झाली. त्यांनी महाराजांना स्वतःच्या दिनचरिय विषयी सांगितले. 86 वर्षाचे असताना देखील डाॅ. डी. वाय्. पाटील मंत्र जप व ग्रंथवाचन करीत असतात.

त्यांनी आतापर्यंत प.पू. परमात्मराज महाराजांचे अनेक ग्रंथ वाचले आहेत.यावेळी महाराजांनी रस्याव हा नूतन ग्रंथ पाटील यांना भेट म्हणून दिला. या ग्रंथाचेही अवश्य वाचन करणार आहे असे डाॅ. डी. वाय्. पाटील म्हणाले. वार्धक्यातही ग्रंथवाचन करत असल्याबद्दल प.पू. परमात्मराज महाराजांनी त्यांचे कौतुक केले.

डाॅ. डी. वाय्. पाटील हे अस व्यक्ती महत्त्व आहे की त्यांच्या नांवावर आज अनेक विद्यापीठे आहेत, स्पोर्टस् अँकॅडमी व शिक्षण क्षेत्रासह इतरही क्षेत्रांमध्ये फार मोठे काम असूनही आध्यात्मिक क्षेत्राविषयी त्यांच्या मनात आवड आहे. आडी ता.निपाणी येथील श्री दत्त क्षेत्राविषयी त्यांना प्रचंड आत्मियता आहे. ते याठिकाणी सातत्याने येऊन परंमपुज्य परमात्मराज महाराजांची भेट घेत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here