गोंदिया जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष सीमा मडावी यांचा कोरोनाने मृत्यू…

भंडारा – प्रशांत देसाई

गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सीमा मडावी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गोंदिया येथील केटीएस सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, आज रविवारला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

गोंदिया जिल्ह्यातील पहिली आदिवासी समाजातील महिला म्हणून त्या फुलचुर जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडून आल्या होत्या. जिल्हा परिषद अध्यक्षपद आदिवासी समाजासाठी राखीव असल्याने सीमा मडावी यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांना निमोनिया झाल्याने कुटुंबियांनी त्यांना शासकीय रुग्णालतात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, त्यांची कोरोनाची तपासणी केली असता, तो पॉझिटिव्ह आला.

मृतक सीमा मडावी यांचे पती विलास हे शिक्षक असून त्यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी आणि बराच मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here