माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन…

फोटो - Twitter

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी मंगळवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यशपाल शर्मा 1983 चा वर्ल्ड कप जिंकणार्‍या भारतीय क्रिकेट संघात सहभागी होते.

त्यांनी आपल्या कारकीर्दीत भारताकडून 37 कसोटी आणि 42 एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 2 शतकांसह 1606 धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा 89 धावा आहेत. ते भारतीय संघाच्या निवड समितीचे सदस्यही राहिले आहेत.

1978 साली सियालकोट येथे खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात यशपाल शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण पाकिस्तान विरुद्ध केले. यानंतर, पुढच्याच वर्षी, त्याने इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला, ज्याला क्रिकेटचा मक्का म्हटले जाते.

शर्मा यांनी 1985 साली इंग्लंड विरुद्ध चंदीगडमध्ये आणि शेवटचा कसोटी सामना 1983 मध्ये दिल्ली येथे खेळला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here