काँग्रेसचे माजी खासदर दामोदर शिंगडा यांचे निधन…

पालघर – संजय लांडगे

वाडा तालुक्यातील पोशेरी शिंगडापाडा येथील रहिवासी असलेले काँग्रेसचे माजी खासदर दामोदर सिंगडा यांचे रविवारी (दि.२ मे) वसई येथील कार्डिनल ग्रेसस या खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. ते ६९ वर्षाचे होते.तत्कालीन डहाणू लोकसभा मतदारसंघातून ते पाच वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.तसेच अनेक वर्षे ते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते.गांधी घराण्यासी त्यांचे निकटचे समंध होते.

देशावर व महाराष्ट्र राज्यवर कोरोना संक्रमनाचे भयानक संकट असल्याने केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे व नियमांचे पालन करून त्यांचा अंत्यविधी कुटुंबियांच्या उपस्थित पार पाडणार असल्याने अंत्यदर्शनासाठी कोणीही येऊ असे त्यांच्या निकटवर्तीयांनी कळवले आहे.

माजी खासदार दामू शिंगडा यांच्या निधनाने पालघर ठाणे जिल्ह्याचा सुमारे पाच दशकांचा सामाजिक राजकीय दुवा निखळला आहे. ते वक्ते नव्हते परंतू खासगी बैठकीत फड गाजवणारे नेते होते. त्यांचा मुत्सद्दीपणा त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावा लागेल.बेबी एमपी असे त्यांना इंदिराजी संबोधित असत.24/25 व्या वर्षी क्रिकेट खेळत असतानाच त्यांना लोकसभेची उमेदवारी करण्याबाबत कळले आणि त्यांनी नाम निर्देशन पत्र दाखल केले. सलग 4 वेळा ते निवडून आले.

रेती प्रश्नावर काँग्रेस सरकार विरोधी आंदोलनावेळी ते काँग्रेस चे ठाणे जिल्हाध्यक्ष होते तर मी प्रदेश काँग्रेस च्या सामाजिक न्याय विभागाचा प्रदेशाध्यक्ष होतो. माझ्या बरोबर आपल्याच पक्षाच्या सरकार विरोधी ते 6 दिवस तुरुंगात राहिले. त्या आठवणी आजही ताज्या आहेत.

“काय रे भावो काय करस?” हा आवाज आता ऐकू येणार नाही. एक नव्या जुन्या राजकारणाचा साक्षीदार, मुत्सद्दी नेता समाजाने गमावला तर मी माझा 3 दशकांचा स्नेह्याला पारखा झालो.त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो ही प्रार्थना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here