नागपूरात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कार्यकर्ते पोलिसांनी घेतले ताब्यात…

शरद नागदेवे,नागपूर

महाराष्ट्रातील आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप सरकारवर सातत्याने दबाव आणत आहे. याच भागात आज नागपुरात ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

फडणवीस यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलय. नागपुरमध्ये देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज आंदोलन झालं. यावेळी फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं, असल्याचं फडणवीस म्हणाले. तसेच, आपल्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं. 

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला होता. शिक्षण आणि नोकरी क्षेत्रात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण असंवैधानिक घोषित केले. मराठा समाजाला कोट्यासाठी सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास घोषित करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हा 2018 महाराष्ट्र राज्य कायदा समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here