शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भाजप मैदानात…तहसील कार्यालयात माजी कृषिमंत्री अनिल बोडेचा डेरा…

अमरावती – प्रज्योत पहाडे

विदर्भासह मराठवाडा मध्ये अनेक ठिकाणी परतीच्या पावसामुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालय. विदर्भात खरीप हंगामात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणा मुळे हिरावून गेलाय. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल की काय अशी भीती व्यक्त केली जातेय.

दरम्यान शेतकऱ्यांच्या समर्थ भाजप मैदानात उतरली आहे. भाजपचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे सद्या अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सद्या आंदोलन करताहेत. नुकताच त्यांनी शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत मिळावी याकरिता चांदुर रेल्वे तहसिल कार्यालयावर डेरा दिलाय.

अनिल बोडे माजी कृषिमंत्री

यावेळी अनिल बोडे यांनी भाजप शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर निशाणा साधला आहे. दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर मुख्यमंत्री यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी आमच्या पद्धतीने साजरी करू असा इशारा दिलाय. यासोबतच १ नोव्हेंबर रोजी अमरावतीत महामोर्चा सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार असल्याचं सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here