घोट वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनपाल,वनरक्षकासह रोजंदारी मजूर एसीबीच्या जाळ्यात…

गडचिरोली : 23जून

तक्रारदार यांना वनक्षेत्राच्या नाल्यातुन रेती वाहतुक करतांना पकडलेल्या रेतीच्या ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करता सोडण्याच्या कामाकरीता वनकर्मचार्यांनी 50 हजार रुपयांची लाच रक्कमेची मागणी करुन तडजोडीअंती रुपये 20 हजाराची ची मागणी करुन लाच रक्कमेचा उर्वरीत हफ्ता रुपये 10,000/- गै.अ.3 यांचे हस्ते स्विकारल्याने

१) लक्ष्मण व्यंकटी गंजीवार, वय 57 वर्षे, वनपाल (वर्ग 3) उपक्षेत्र घोट, वनपरिक्षेत्र कार्यालय घोट ता.चामोर्शी जि.गडचिरोली, २) नागोजी रावजी सिडाम, वय 51 वर्षे, पद-वनरक्षक (वर्ग 3) नियतक्षेत्र घोट, उपक्षेत्र घोट, वनपरिक्षेत्र कार्यालय घोट, ता.चामोर्शी जि.गडचिरोली.

३) रुपेश वसंत चलाख, वय 33 वर्षे, रोजंदारी मजुर, (खाजगी इसम) वनपरिक्षेत्र कार्यालय घोट, ता.चामोर्शी जि.गडचिरोली या तिन्ही आरोपीतांना लाच घेताना लाच लुचपत विभाग गडचिरोलीने रंगेहात पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, राजेश दुधलवार, अप्पर पोलीस अधिक्षक, परिक्षेत्र नागपूर, पोलीस उप अधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात तपासी अधिकारी रवि राजुलवार पोलीस निरिक्षक सह सापळा कारवाई पथकचे

पोनि रवि राजुलवार, पोहवा नथ्थू धोटे, पो.ना. सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, पोशि गणेश वासेकर, किशोर ठाकुर, चापोना तुळशिराम नवघरे सर्व ला.प्र.वि. गडचिरोली यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here