कोगनोळीत मगर आलेल्या ठिकाणी वन अधिकाऱ्यांच्याकडून पाहणी…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

दोन दिवसापूर्वी कोगनोळी ता.निपाणी येथील काही तरुणांना नदी काठी सहा फुटाची मगर निदर्शनास आली होती.यानंतर याठिकाणी जाणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.ही माहिती समजताच माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी चिक्कोडी येथील वन अधिकाऱ्यांना याची सुचना दिली होती.

दि 6 रोजी डी आर एफ ओ प्रभाकर गोकाक आणि बाबासो पाटील या वन अधिकाऱ्यांनी कोगनोळीत मगर निदर्शनास आलेल्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी पाहणी केली असता.मगरीच्या पायाचे ठसे दिसले आहेत..यावरून स्पष्ट होते कि या परिसरात मगर आहे.

यावेळी प्रभाकर गोकाक म्हणाले पाण्यापासून किमान पन्नास ते साठ फुट मगर जमीनीवर असेल तर धरता येते..अथवा मगर असणाऱ्या खडयातील सर्व पाणी उपसा करून धरावी लागले…मगरी पासून माणसाला धोका होतो का?विचारले असता..ते म्हणाले सतत पाण्यात असल्यामुळे मगर शांत वातावरण असल्यावरच कोवळ्या उन्हात येत असते.

सुमारे साठ फुट लांब असलेल्या माणसाच्या पायाच्या आवाजवरुन मग पुन्हा पाण्यात जाते..हा प्राणी माणसाच्या वर्दळीला भित असतो. मात्र संशयित मगर असलेल्या पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळावे.कारण पाण्यात मगरीला दहा हत्तीच्या ताकतीसारखी ताकद असते असे सांगितले…त्यामुळे याठिकाणी गेले असता ,गवत कापत असता सावधान असणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here