पालघर जिल्ह्यातील जंगलाला आग…वनविभागाकडून झोपेचं सोंग…

राहुल पाटील – पालघर

पालघर – पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या जंगलांना वणवे लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून काल रात्रीच्या सुमारास पालघर मधील तब्बल 20 ते 25 जंगलांना वनवा लावला केल्याचं दिसून आल . यात शेकडो हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाली आहे.

रात्रीच्या सुमारास जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी हे वणवे लावले जात असले तरी या वणव्यांमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होताना पाहायला मिळतोय. वृक्षारोपणाचा कार्यक्रमांच्या वेळी जनतेला वृक्षारोपण आणि संवर्धनाचा आवाहन करणारं वनविभाग मात्र यावेळेस काहीही उपाययोजना किंवा कारवाई करताना दिसत नाहीये .

या वनव्यांमध्ये वन विभाग तसच विविध सामाजिक संस्थांकडून पावसाळ्यात करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणाच्या लाखो रोपांचही नुकसान सुरू आहे . मागील महिनाभरापासून पालघरमध्ये हा प्रकार सुरूच असून वनविभाग मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसतंय . या सगळ्यामुळे पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक सनागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here