वन विभागातील देगलुर परिक्षेत्रातील अधिकारी व मराठवाडा सर्व श्रमिक संघटना नांदेड व वन मजुरांचा संयुक्त चर्चा अंती धरणा कार्यक्रम मागे घेण्यात आले…

मरखेलकर – दंतुलवार सोपान

देगलुर येथिल वन खात्यात इ. स. 1990 पासुन वन मजुर म्हणुन काम करणाऱ्या वन मजुरांना सेवा जेष्ठता प्रमाणे कामावर ठेवने ऐवजी आधिकारी आपल्या मनमानी प्रमाणे जुन्या वन मजुरांना डावलुन नविन मजुरांना किमान वेतन प्रमाणे वेतन देण्या ऐवजी २०० रुपये प्रती दिवस प्रमाणे वेतन देत आहेत म्हणुन ही मागनी बऱ्याच दिवसा पासून असल्यामुळे दिनाकं 28-06-2021 रोजी वन परिक्षेत्र आधिकारी परिक्षेत्र देगलुर येथे निवेदन दिले आहे.

या निवेदनात वरील मागण्या दिनांक 01-07-2021 मान्य न झाल्या मुळे दिनांक 06-07-2021 पासुन धरणे आंदोलन करण्यात येत आहे या वेळी मराठवाडा सर्व श्रमिक संघटना महाविर नगर नांदेड चे सरचिटनिस बी. के. पांचाळ यांचे उपस्थित मध्ये हे धरणे आंदोलना चा पाहिला दिवस आहे ह्या वेळी वन परिक्षेत्र आधिकारी श्री केन्द्रें साहेब आणि वनपाल श्री गुरूपवार साहेब आणि वनपाल श्री गेडाम साहेब उपस्थित झाल्या मुळे सर्व प्रकार ची चर्चा झाल्या मुळे स्थानिक प्रश्न निकाली काढल्या मुळे आजचा धरणा कार्यक्रम मागे घेण्यात आले यावेळी वन मजुर आशोक गोविंदराव मदळे, आशोक हिरामण वाघमारे, मुरली दशरथ गंगलवाड, प्रकाश गंगाराम कांबळे, लच्छीराम धर्माजी राठोड , आनंदा नागा रिजितवाड, भाऊराव ठाणु चव्हाण, शकंर भाऊराव गायकवाड, विक्रम सायबु कळकवाड आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here