काळ आला होता, पण वेळ आली नाही; दैव बलवत्तर म्हणून दोन पलट्या होऊनही वाचला जीव…

पातूर – निशांत गवई

बाळापूर-पातूर रोडवर एमआयडीसी नजीक कार पलटी होऊन अपघात झाला.सदर अपघाताचे प्रथमदर्शनी स्वरूप पाहता फारच भीषण असल्याचे भासते मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून चालकाचे प्राण वाचले.

प्राथमिक आरोग्य केंद्र,सस्ती येथे कार्यरत असलेले डॉ.निलेश गाडगे हे कामानिमित्त सस्तीवरून कोविड सेंटर,पातूर येथे आपल्या टाटा नेक्सॉन कार क्रमांक MH 30 BB 0684 ने येत असता देऊळगाव नजीक असलेल्या MIDC समोर अचानक गाडीचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व गाडीच्या दोन पलट्या होऊन गाडी उलटी पडली.सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही.

सदर अपघाताची माहिती मिळताच स्थानिक मदतीला धावून आले असता त्यांनी पाहिलेले चित्र आश्चर्यजनक होतं ! डॉ.निलेश गाडगे हे आपल्या पलटी झालेल्या कारमधून बाहेर निघून उभे होते व त्यांच्या अंगाला साधी खरोच सुद्धा नव्हती हे पाहून बघ्यांच्या तोंडून “काळ आला, पण वेळ आली नव्हती” असे उदगार निघाले नसतील तर नवलच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here