अहमदपूर – चाकूर तालुक्यातील जलसंधारणाच्या कामासाठी १५ कोटी ३ लाख रूपयांचा निधी मंजूर..आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब…

375 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार, शेकडो शेतक-यांना थेट फायदा.

बालाजी तोरणे अहमदपूर तालुका प्रतिनिधी

अहमदपूर, ता.11( बातमीदार):अहमदपूर व चाकूर  तालुक्यातील 15  गावात कोल्हापुरी बंधारे व सिमेंट बंधाऱ्यासाठी जलसंधारण विभागामार्फत 15 कोटींचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरूवात  होणार असल्याची  माहिती आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी दिली.  

अहमदपूर तालुक्यातील शिंदगी (बु) 1 कोटी 45 लाख, टाकळगाव कामखेडा 1 कोटी 45 लाख, होटाळा 1कोटी 42 लाख, रोकडा सावरगाव 1 कोटी 43 लाख,  हगदळ गुगदळ 1 कोटी 1 कोटी 38 लाख,  कोपरा 1कोटी 42 लाख,  गोताळा 94 लाख, तांबटसांगवी 1कोटी 26 लाख, 

खरबवाडी गादेवाडी 97 लाख,  थोरलेवाडी 97 लाख,  सलगरा 90 लाख तर चाकूर तालुक्यातील वडवळ साठी 1 कोटी 45 लाख असा एकूण पंधरा गावासाठी 15 कोटी 3 लाख 69 हजार 769 रूपयाचा निधी मंजूर झाला असून त्याच्या पुढील प्रक्रिया तात्काळ मंजूर करण्यात येणार आहेत.

तालुक्यातील अधिकाधिक शेती सिंचनाखाली येणे हा मुख्य हेतू असून पडीत जमीनीचा विकास व त्या माध्यमातून रोजगारांची संख्या वाढणार आहे.सिंचनाच्या माध्यमातून ‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना तालुक्यातील शेतक-यांसाठी आणणार असून या  जलसंधारणाच्या नविन कामातून शेकडो

हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन शेकडो शेतक-यांना आर्थिक सुबत्ता मिळेल.सिंचना सोबत परीसरातील जनावरांचा चारा व पाणी प्रश्न मिटणार आहे असे आमदार बाबासाहेबजी  पाटील साहेब यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here