प्रहारच्या पाठपुराव्याने मिळाले अपंग कुटुंबाला एकाच दिवसात अंतोदय कार्ड…

मुर्तीजापुर तालुक्यातील गाजीपुर येथील गोपाल विठ्ठलराव गोंडचर एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती दोन्ही डोळ्यांनी अपंगत्व असलेले बरेच दिवसापासून गाजीपुर मध्ये वास्तव्य करीत असलेल्या कुटुंबांना अंत्योदय योजनेपासून येथील अधिकाऱ्यांनी वंचित ठेवले. जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आदेश असल्यावरही अपंग कुटुंबाला अंत्योदय योजनेचा लाभ मिळत नव्हता. अर्ज करून चार महिन्याचा कालावधी निघून गेला होता.

नंतरही पुरवठा विभाग अधिकारी हेतू परस्पर अपंगांना डावलत होते.आणि जेव्हा अपंग व्यक्ती त्यांना विचारण्याकरिता जात होते. तेव्हा उडवाउडवीचे उत्तर देऊन त्यांना घरी पाठवण्यात येत होते. अशी तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाकडे आली असता. मा. अनिल भाऊ गावंडे (प्रदेशाध्यक्ष) व बल्लूभाऊ जवंजाळ यांनी तात्काळ अपंगांच्या हिताचा निर्णय घेऊन.

प्रहारचे तालुकाध्यक्ष अमोल वानखडे यांना दूरध्वनीवरून संपर्क केला. व तालुकाध्यक्ष यांनी पालकमंत्री कार्यालयाला भेट घेऊन श्री ज्ञानेश्वर वकटे साहेब( सहायक विशेष कार्य अधिकारी ) साहेबांसोबत अपंगाच्या विषयावर चर्चा केली. आणि मी फक्त अपंग विधवा शेतकरी शेतमजूर या लोकांसाठी तालुका अध्यक्ष पद घेतलं… आणि मी जर त्यांना न्याय देऊ शकत नसेल तर माझ्या पदाचा काय फायदा असे दुःख त्यांच्यासमोर मांडले.

त्यांनी तात्काळ दखल घेऊन पुरवठा विभाग अधिकारी यांच्याशी संपर्क करून अपंग कुटुंबांना न्याय द्या. जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा आदेश असल्यानंतरही तुम्ही अपंग कुटुंबांना अंत्योदय योजना पासून का वंचित ठेवले. अशी विचारणा केली असता. त्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन तात्काळ अंतोदय राशन कार्ड अपंगांना वितरीत केले. प्रहार जनशक्ती पक्षाकडे तहसील विभागाच्या येत असलेल्या वेळोवेळी तक्रारी व यामध्ये प्रामुख्याने पुरवठा विभागाच्या जास्त प्रमाणात तक्रारी आहेत.

त्यामध्ये पुरवठा विभाग जर आपल्या मतलबासाठी दोन-तीन महिने फाईली थांबवत असतील.तर सेवा हमी कायद्याची उल्लंघन करत आहेत. असे यावरून स्पष्ट होते. आणि सेवा हमी कायद्याची जर उल्लंघन होत असेल तर प्रहार जनशक्ती पक्ष जनतेच्या हितार्थ योग्य तो मार्ग स्वीकारेल. असे आम्ही त्यांना जाहीरपणे आव्हान करतोय…राजकुमार नारायणराव नाचणे. (विधानसभा संपर्कप्रमुख) अमोल वानखडे (तालुका अध्यक्ष) सागर पाटील पुंडकर (शहर प्रमुख),

राम पाटील कांबे. पुरुषोत्तमजी डागा. अंकुश हरणे. संदीप कोहाळे विवेक बांबल विशाल पाथरे. मिथुन राठोड. राहुल चौडाले. संग्राम ताथोड. राहुल डिके.सोपान वानखडे.शिवाजी गावंडे.सत्यम देशमुख. शुभम गावंडे. विवेक जगताप. . राहुल थिटे. गोपाल परीक्षे. अभिषेक वानखडे. शुभम चव्हाण. अभिजित चव्हाण. मयुर पुरी. अक्षय वानखडे. हरीओम शिंदे. श्रेयश पाथरे. मयूर साबळे अनिकेत इंगोले मयूर तायडे. त्रिशूल इंगळे अथर्व राजगुरे प्रहारचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here