अकोल्यात मोर्णा नदीला महापूर…अनेक कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलविले…

अकोला महापूर

अकोला शहरात रात्री आठच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने अनेकांचे संसार ध्वस्त केले. गेल्या १५ ते २० वर्षानंतर प्रथम इतका पाऊस पडल्याने अकोलेकरांनी अनुभवले आहे. रात्री सुमारे एक वाजता पासूनच मोर्णा नदीला महापूर आल्याने नदी काठावर असलेले कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. अजुही बचावकार्य सुरूच आहे. पुराचे पाणी घरामध्ये शिरल्याने घरातील गृहपयोगी पाण्यात वाहून गेल्याची माहिती.

अकोला शहरातील डाबकी रोड, जुने शहर, घुसर मोठी उमरी ,रतानलाल प्लॉट, तसेच जवाहर नगर, गोकुळ कॉलनी ,प्रसाद सोसायटी, गोइंका लेआउट, मुकुंद नगर ,आदीं भागांमध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे एकच तारांबळ उडाली महानगरपालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे

खडकी, कौलखेड, सिंधी कँम्प परिसरात मोर्णा नदीच्या पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरले आमदार रणधीर सावरकर यांनी रात्री १ वा. पासुनच बचाव कार्य सुरू केले, पुरात अडकलेल्या सुमारे पन्नास लोकांना तातडीने बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले, खडकी परिसर परिसरातील श्रद्धा नगर, सूर्या हाईट, स्मशानभूमी या परिसरात मोरणा नदीचे पाणी घुसले आहे, पूर इतका प्रचंड आहे की, मोरणा नदीने पात्र बदलून पुराचे पाणी या परिसरात घुसले आहे.

वीज पुरवठा खंडित करावे लागल्यामुळे बचावकार्याला अडचणी निर्माण होत आहेत, आमदार रणधीर सावरकर यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी बचावकार्यात गुंतले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे, प्रशासनाला बचावकार्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी तातडीच्या सूचना दिल्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here