पूरग्रस्तांना मदत न मिळाल्यास मंगळवारी जलसमाधी आंदोलन करणार – दलित महासंघाचा इशारा…

सांगली – ज्योती मोरे

पूरग्रस्त नागरिकांना शासनानं जाहीर केलेली मदत तात्काळ मिळाली पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी आज सांगलीतील शिवशंभो चौकात, दलित महासंघाच्या वतीनं, प्रदेश कार्याध्यक्ष सतीश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.

आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत आणि संबंधित अधिकारी आमच्या पर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरुन उठणार नाही. या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम राहिल्यानं, वाहतूक तुंबली गेली होती.सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक अजय सिंदकर यांच्यासह पोलिसांनी आदोलनकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला, परंतु पूरग्रस्त नागरिक रस्त्यावरुन हटले नाहीत.

शेवटी नाइलाजानं अधिकाऱ्यांना आंदोलन स्थळावर येऊन, निवेदन स्वीकारावं लागलं. दरम्यान आजच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास, येत्या मंगळवारी कृष्णा घाटावर जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशाराही सतिश मोहिते यांनी दिलाय. मिरज तालुक्यातील काॅग्रेसचे उपसभापती अनिल आमटवणे व अण्णासो चिवटे यांची सावकारी रोखा अन्यथा तीव्र आंदोलन:– वंचित बहुजन आघाडी व प्रहार जनशक्तीचा इशारा…

सतिश मोहिते

मिरज तालुक्यात खाजगी सावकारी जोर धरत आहे. मिरज येथील काँग्रेसचे मिरज पंचायत समिती मधील उपसभापती अनिल आमटवणे व त्यांचे मेहुणे अण्णासो चिवटे हे दोघेही गोरगरीब , कष्टकरी, शेतकऱ्यांच्या अडचणीत सहानभुती दाखवत सावकारी व्यवसाय सुरू केला आहे. त्या माध्यमातून सावकारी व्याजाने गोरगरीब, कष्टकरी व शेतकरी यांचे कोऱ्या बाँड, कोरे चेक व उसनवार पावती इ. वर सह्या घेऊन जमिनी हडप करत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडी व प्रहार कडे प्राप्त झाली आहे.

सदर विषयातील पीडित व्यक्तींना घेऊन आज वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने मा.पोलिस अधीक्षकसो (S P) सांगली यांची भेट घेऊन निवेदन दिले. सदर निवेदनात म्हटले आहे,काँग्रेसचे उपसभापती अनिल आमटवणे व त्यांचे मेहुणे अण्णासो चिवटे यांनी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून मिरज तालुक्यातील आर्थिकदृष्टया गोरगरीब,कष्टकरी मागासवर्गीय गरजू लोकांना त्यांच्या गरजे करता व्याजाने रक्कम देऊन व्याजाच्या मोबदल्यात संबधित लोकांचे जमिनी हडप केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

तसेच अनिल आमटवणे हे त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीचा धाक दाखवून धमकावित जिवे मारण्याची धमकी देत आहेत. अश्या धमकी देणाऱ्यास मोका कायद्या अंतर्गत कारवाई व्हावी. त्यांनी केलेले गुन्हे गंभीर स्वरूपाचे असून त्यांच्या दहशतीमुळे कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नाही. तरी पोलिस अधीक्षकानी स्वतः लक्ष घालून सदर व्यक्तीच्या विरूध्द सावकारी गुन्ह्या खाली कारवाई करावी त्याचसोबत त्याचा व्यवसाय, व्यवसायातून मिळणारे उत्पन्न व सावकरीतून देण्यात येणाऱ्या रकमा यांचा तालेबंद करावा व त्यांच्यावर आयकर विभागाच्या मार्फत चौकशी करण्यात यावी व पीडित व्यक्तीं व त्यांच्या कुटुबियांना न्याय मिळवून द्यावा.

आवळे नावाच्या पीडित व्यक्तीच्या संबंधातून अट्रोसिटी कायद्या अंतर्गत कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी,प्रहार संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, जिल्हा महासचिव उमर फारूक ककमरी, जिल्हा संघटक संजय कांबळे, प्रहार जनशक्तीचे मिरज तालुका अध्यक्ष पोपट माने, मिरज तालुका सचिव राजू कदम, जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील व सर्व पीडित शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here