पुराने बाधित कुटुंबांना ५ हजाराची तातडीची मदत,शेतक-यांना हेक्टरी १८ हजार नुकसान भरपाई, ना. वडेट्टीवार यांच्या प्रशासनाला सूचना…

लाखांदूर – नास्तिक लांडगे

गोसे धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने लाखांदूर तालुक्यात वैनगंगा व चुलबंद नदीला पूर येऊन पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे व अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे शेतकऱ्यांची पीक शेती पूर्णतः नष्ट झाल्याने बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून हेक्‍टरी 18 हजाराची नुकसान भरपाई देण्यात येणार असून पुराने बाधित कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार रुपये तातडीची मदत द्या अशा सूचना ना. विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला दिल्या आहेत.

सदर सूचना गत 3 सप्टेंबर रोजी लाखांदूर तालुक्यातील सोनी गावात पूर परिस्थितीची पाहणी व चौकशी दरम्यान दिल्या. ते म्हणाले लाखांदूर तालुक्यात वैनगंगा व चुलबंद नदीच्या पुराने मोठ्या प्रमाणात पीक शेतीची हानी झाली असून शेकडो घरांची पडझड देखील झाली आहे.

अनेक कुटुंब बेघर झाले असल्यामुळे पूर परिस्थितीत विस्थापीत देखील झाले आहेत. या कुटुंबांना तातडीची मदत म्हणून रोख पाच हजार रुपये देण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकप शेतीचे पंचनामे करून पुराने बाधित शेतकऱ्यांना हेक्‍टरी 18 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याच्या सूचना केल्या.

दरम्यान तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपये देताना उर्वरित मदत शासन निर्णय होताच आठ ते दहा दिवसात देण्यात येणार असल्याचे देखील आवर्जून सांगितले. तसेच शासनाकडून पुराने बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून हेक्‍टरी 18 हजार रुपये देत असताना पिक विमा देखील लागू केला जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी भंडारा जिपचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे, माजी जिप सदस्य मनोहर राऊत, प्रदीप बुराडे, डॉ.सुरेश ब्राह्मणकर, भूमेश्वर महावाडे, ग्राम विकास अधिकारी मुंडे ग्रापं सदस्य विकास बुरडे, जिल्हाधिकारी संदीप कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, तहसीलदार संतोष महाले, ठाणेदार शिवाजी कदम, बिडिओ जी.पी.अगर्ते, तालुका कृषी अधिकारी शेन्नेवाड यासह अन्य अधिकारी कर्मचारी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here