कोल्हापूर प्रतिनिधी-राजेद्र ढाले
नेर्ली ता (करवीर) येथे 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नेरली येथील लोकनियुक्त सरपंच व गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी स्वच्छता दुताना मान देत यावेळी नेरली ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी रंजीत गुरव यांच्या हस्ते ध्वज पूजन व महिला सफाई कर्मचारी नंदा शिंदे बाळा बाई कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सरपंच प्रकाश पाटील उपसरपंच अमर पाटील ग्रामपंचायत सदस्य संजय चौगुले राहुल पाटील प्रदीप ढाले अंकुश धनगर ग्राम विकास अधिकारी एस आर हासुरे यांच्यासह विविध संस्थांचे व इतर मान्यवर प्रमुख अतिथी ग्रामस्थ उपस्थित होते