विटांनी भरलेला ट्रक उलटून चालकासह पाच जण जखमी, रामटेक तुमसर मार्गावर टुरिस्ट ढाब्याजवळ घडली दुर्घटना…

रामटेक – राजू कापसे

रामटेक तुमसर मार्गावर टुरिस्ट ढाब्याजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटून चालकासह पाच जण गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना दि.5 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, शिवा भट्टा घोटी टोक येथून ट्रक क्रमांक एम एच 40,वाय 9455 विटा घेऊन भरधाव वेगाने रामटेक कडे येत असताना नागार्जुन जवळच्या टुरिस्ट ढाब्याजवळ सकाळी दहा वाजताच्या सुमारास पलटला.

ट्रकचालक संजय वामन ठाकरे (वय45) रा-कामठी,मजुर अरुण आसाराम रतनपुरे (वय 45) रा-लोहारा,विजय ताराचंद नागोसे (वय 35) रा- पंचाळा खुर्द,उमेश गुलाब रंधई (वय 30) राहणार घोटी टोक व अनिल कचरू परतीते (वय 42) रा- पंचाळा हे या घटनेत जखमी झाले.

जखमींना रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी चालक संजय वामन ठाकरे व अरुण असाराम रतनपुरे यांना ते गंभीर जखमी असल्याने नागपूर येथे रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.रामटेक पोलिसांनी याप्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंदविला असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here