अकोला | काळ आला होता पण वेळ आली नव्हती…कार पलटी होऊनही १७ महीण्याच्या बाळासह पाचजण सुखरुप…

अकोला – अकोलाच नव्हे तर देशात कुठही आपत्ती आली तर नेहमीच धावून जाणारे पिंजर येथील जिवरक्षक दीपक सदाफळे आणि त्यांची टीम हे नेहमीच सेवेसाठी तत्पर असतात. काल रात्री दोन वाजता 17 महीण्याच्या बाळाला अकोला येथे हाॅस्पिटल ला घेऊन जात असतांना कारंजा रोडवर पिंजर नजिक डुक्कर आडवे गेल्याने कार पलटी झाली या कार मध्ये बाळासह एकूण पाच जण होते. पलटी झालेल्या कारमधील पाचही जण सुखरुप आहेत.

सदर घटनाक्रम असा 28 जुलै रोजी रात्री 2:30 वाजता पिंजर येथील आशिष मानकर याने जिवरक्षक दीपक सदाफळे यांना फोनवरून माहिती दीली की माझ्या मित्राची गाडी कारंजा रोडवर पलटी होऊन अपघात झाला आहे.

अशी माहिती मिळताच पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दहामिनटातच घटनास्थळी पोहचले आणी पाहले आणी विचारपुस केली असता धानोरा ताथोड ता.कारंजा जिल्हा वाशिम येथील रहिवासी असलेले कुटुंब आपल्या 17 महीण्याच्या बाळाला कारंजा येथील खासगी हाॅस्पिटल येथुन डाॅक्टरांच्या सांगण्यानुसार अकोला येथे तात्काळ घेऊन जाण्याचे सांगीतले होते.

यावेळी घरच्या कारने कारंजावरुन अकोलाकडे जात असतांना पिंजर नजिक टर्निंगवर डुक्कर आडवे गेल्याने या अपघातात कार पलटी झाली आणी अपघात झाला दैव बलवत्तर की या मधील सर्वचजण सुखरुप आहेत कुणालाही इजा झाली नाही हे विषेश.

क्षणाचाही विलंब न करता जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी आपल्या गाडी मध्ये बाळासह आई वडील आणी आजोबांना घेऊन अवघ्या 45 मिनिटांतच अकोला येथे हाॅस्पिटल मध्ये दाखल केले आता बाळही सुखरुप असल्याची माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here