घरफोडी व चोरीचे पाच गुन्हे उघडकीस;स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही…

दर्यापूर – श्रीकृष्ण निचळ

आज दिनांक 26 ऑगस्ट 2020 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संशयित नामे 1) सनोज रेवाराम धूर्वे 2) कृष्णा रेवाराम धूर्वे दोघे रा. परतवाडा यांना ताब्यात घेऊन कसोशीने विचारपूस केली असता.

त्यांनी त्यांच्या साथीदार नावे चमन गायकी राह. बैतूल गंज( मध्यप्रदेश) यांच्या सोबत मिळून परतवाडा येथे दोन घरफोड्या व एक मोटरसायकल चोरी तर चांदूरबाजार व अंजनगाव येथे घरफोडी चा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यावरून नमूद दोन्ही आरोपींकडून एक मोटर सायकल, दोन LED टीव्ही, होम थिएटर व सोन्याचे दागिने , असा एकूण 150450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री हरी बालाजी N सर ,अप्पर पोलीस अधीक्षक श्री शाम घुगे सर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुरज बोंडे PSI विजय गराड PSI अशिष चौधरी , ASI संतोष मुंदाने, HC त्र्यंबक मनोहरे, NPC प्रमोद खर्चे, योगेश सांभारे ,प्रवीण अंबाडकर, दिनेश कनोजिया ,चालक HC सईद, विशाल भानुसे , शिवा शिरसाट व महिला NPC वैशाली तिवारी यांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here