तिरोडा गोरेगांव विधानसभा क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आमदाराच्या जनसंपर्क कार्यालयासमोर सहकारी पत संस्था जागृती भ्रष्टाचार संघर्ष समिती ठेवीदारांतर्फे १ दिवसीय धरणे आंदोलन…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील जागृती सहकारी पत संस्था मर्या. मुंडीकोटा र. न. ७९७-९५ ता. तिरोडा येथील संचालक मंडळ व शाखा व्यवस्थापकांनी केलेल्या भ्रष्टाचाराची दखल न घेतल्यामुळे तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या कार्यालयासमोर जागृती भ्रष्टाचार संघर्ष समिती ठेवीदारांतर्फे 25 /11 /2021 रोज गुरुवारला 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे पहिल्यांदाच तिरोडा गोरेगांव विधानसभा क्षेत्रात आमदाराच्या जनसंपर्क कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे.जागृती सहकारी पत संस्थेविरोधात केलेल्या तक्रारीमुळे जिल्हा उपनिबंधक सहकारी पत संस्था गोंदिया यांनी चौकशी करून २०१५ ते २०१९ या आर्थिक वर्षाचे फेरलेखापरीक्षणाचे आदेश दिले होते.

लेखापरीक्षक सहकारी संस्था गोंदिया वर्ग-१ यांनी केलेल्या फेरलेखापरीक्षणात ३ कोटी ३० लाख ७१ हजार रुपयांची अफरातफर व १५ कोटी ३२ लाख ४४ हजार ९१ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे लेखापरीक्षण अहवालात सिद्ध झाले. त्या अनुषंगाने लेखापरीक्षक वर्ग-१ यांनी १६ आजी-माजी संचालक व १२ शाखाव्यवस्थापक यांच्याविरुद्ध दि. ३० डिसेंबर, २०२० ला तिरोडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी सर्व २८ आरोपींविरुद्ध भादवी कलम अनुक्रमे ४०६, ४०९, ४२०, ३४, ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संवर्धन अधिनियम ३ व ४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. २८ पैकी फक्त १ आरोपी भंडारा कारागृहात कैद आहेत. व बाकीचे सर्व आरोपी अग्रीम जमानतीवर आहेत.उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया यांनी संस्थेवर अकार्यक्षम व हलगर्जी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नियुक्ती केली असून मागील दीड वर्षापासून संस्थेच्या संदर्भात कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

या पत संस्थेमध्ये ग्रामीण भागातील सहा हजार शेतकरी, कष्टकरी, रोजंदारी काम करणारे व मध्यमवर्गीय गरिब जनतेचे ४२ कोटी रुपयांच्या ठेवी संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे रखडल्या असून आपल्या जमाठेवी न मिळाल्याने संतप्त होवून आतापर्यंत १५ ठेवीदारांचा मृत्यू झाला असून अनेक ठेवीदारांची शारीरिक, मानसिक व आर्थिक स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

तिरोडा- गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे वर्तमान आमदार विजय रहांगडाले यांनी जनप्रतिनिधी म्हणून या घटनेची दखल न घेता पिडीत ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी किंचितही पुढाकार घेतलेला नाही. म्हणून दि. 25/11/2021 रोज गुरुवारला जागृती भ्रष्टाचार संघर्ष समिती ( मुंडीकोटा तिरोडा ) ठेवीदारांतर्फे १ दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असून यात काही अप्रिय घटना घडल्यास याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची व प्रशासनाची राहील असे.

मुख्यमंत्री, सहकार मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, आमदार विजय रहांगडाले साहेब तिरोडा /गोरेगांव विधानसभा क्षेत्र, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब तिरोडा, तहसीलदार साहेब तिरोडा, पोलीस निरीक्षक साहेब तिरोडा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here