Saturday, June 3, 2023
Homeव्यापारनेक्स्ट-जनरेशन एमजी हेक्टरच्या पहिल्या टीझरचे अनावरण...

नेक्स्ट-जनरेशन एमजी हेक्टरच्या पहिल्या टीझरचे अनावरण…

भारतातील सर्वात मोठी १४-इंच एचडी पोर्ट्रेट इन्फोटेनमेंट स्क्रीन मिळणार

मुंबई – एमजी मोटर इंडियाने लाँचिंगच्या आधीच पहिल्यांदा २०२२ हेक्टर फेसलिफ्ट एसयूव्हीचा टीझर लाँच केला आहे. यात भारतातील सर्वात मोठी १४ इंचाची एचडी पोर्ट्रेट इंफोटेनमेंट सिस्टम मिळेल. विशेष म्हणजे हे फीचर्स भारता पहिल्यांदाच कोणती कंपनी देते आहे. ब्रँडनुसार नेक्स्ट-जेन हेक्टरच्या इंटीरियरची संकल्पना ‘सिम्फनी ऑफ लक्झरी’ वर आधारित आहे. जे पूरक सिनेमॅटिक आणि सर्वोत्तम अनुभव देते.

भारतातील पहिली इंटरनेट कार म्हणून लाँच करण्यात आलेली हेक्टर शक्तिशाली, साहसी, पण विश्वसनीय व विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते. आपल्या अद्वितीय वारसाला अधिक दृढ करत हेक्टर इन-कार अनुभव सुधारित करण्यासाठी आणि आधुनिक ग्राहकांच्या विचारसरणीला व्यापून घेण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.

भारतातील ऑटोमेकर्स १०.४ इंच आकारापर्यंत टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन ऑफर करत आहेत. ज्यामुळे एमजी हेक्टरची स्क्रीन लाँच झाल्यावर सर्वात मोठी ठरेल. एमजी हेक्टर भारतीय बाजारपेठेत २०१९ मध्ये लाँच करण्यात आली होती. गाना, ऍक्युवेदर यासह अनेक इनबिल्ट सॉफ्टवेअर ऑफर करणारी ही भारतातील पहिली कार होती. एमजी हेक्टर ‘भारताची पहिली इंटरनेट कार’ म्हणून ओळखली जाते. एमजी मोटरने भारतीय बोलींनुसार अनेक भाषांमध्ये व्हॉईस कमांड फंक्शन्स देखील सादर केले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: