स्वराज्य कोकण कला मंच (मुंबई)चा नालासोपारा येथील पहिला प्रयोग हाऊसफुल…

आयोजक डॉ. संजय जाधव आणि प्रकाश नाडकर यांचे रसिकांनीमानले आभार.

मुंबई – धीरज घोलप

नालासोपारा पूर्व साई छाया विद्या मंदिर जिजाईनगर येथे आयोजक  डॉ. संजय जाधव,  प्रकाश नाडकर आणि  दिपक मांडवकर यांच्या विद्यमाने स्वराज्य कोकण कला मंच(मुंबई)चा प्रयोग पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक किसन बंडागळे आणि डॉ. संजय जाधव यांचे चिरंजीव तरुण नेतृत्व कु. सिद्धेश संजय जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. स्वराज्य कोकण कलामंच (मुंबई) प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून ऐतिहासीक वघनाट्य (श्रीमंतयोगी राजा सह्याद्रीचा) हा वगनाट्य कार्यक्रम सादर झाला.

कोरोना पार्श्वभूमीवर एक वर्ष सांस्कृतिक कार्यक्रम हॉल, नाट्यगृह बंद असताना कलाकारांचे तसेच अनेक सांस्कृतिक मंचाचे खूप नुकसान झाले.परंतु पुन्हा नालासोपारा येथे या कार्यक्रमासाठी चारशे रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शविली.त्यामुळे गेल्या  वर्षीचे स्वतःचेच रेकॉर्ड मोडीत काढत पुन्हा या वर्षीही हा कार्यक्रम चारशेहून अधिक रसिक  प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला.

त्यामुळे  स्वराज कोकण कलाकारांनी पुन्हा आपली सिद्धता खरी करून दाखवली व रसिक मायबाप प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकानी अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करणारे कलाकार  संदेश येद्रे आणि जिजाऊंच्या भूमीकेत कु. सोनाली शिंदे, अफजल खान, औरंगजेब, सरजेराव, तानाजी मालुसरे, मावळे, सेनापती सर्वांनी आपली भुकिमा रशीकांना भाऊन गेली. 

तर या कार्यक्रमाचे निर्माते दिग्दर्शक  राजेश येद्रे यांच्या नेतृत्वाखाली हे वगनाट्य सादर करताना उत्कृष्ट कलाकार या स्वराज कोकण कलामंच (मुबई) मध्ये घडवत असल्याचे दिसून आले.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आयोजक मंडळातील चाळीस सभासदांनी अगदी उत्कृष्ठपणे पार पाडले.

रंगमंचामध्ये प्रवेश करताना प्रत्येक प्रेक्षकांना मास्क लावून बसवण्याची जबाबदारी घेऊन, प्रत्येकाला  सामाजिक अंतर पाळून बसवण्यात आले. कार्यक्रम हाऊसफुल झाल्यानंतर आयोजक प्रकाश नाडकर यांनी सर्व कलाकार आणि प्रेक्षकांसहित सर्व चाळीस सभासदांचे आभार मानले. असेच सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने व्हायला हवेत असे मत अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here