औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी रुग्णालयाचे फायर ऑडिट होणार…

औरंगाबाद – विजय हिवराळे

भंडारा येथील घटनेनंतर शहरासह जिल्ह्यातील सर्व रूग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेच्या अग्नीशमन विभागाने सर्व रुग्णालयांची यादी मागवली होती. यात मनपाची ३९ रुग्णालये, तर ६०० खाजगी रुग्णालयांची यादी आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेची यादी प्राप्त होताच सर्वांना अग्नीरोधक यंत्रणेसंदर्भात नोटीसा बजावल्या जाणार आहे. त्यानंतर फायर ऑडीट केले जाईल, अशी माहिती अग्नीशमन विभागाचे प्रमुख आर. के. सुरे यांनी दिली.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील सरकारी व खासगी रुग्णालयांना पालिकेच्या अग्नीशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.शहरासह जिल्हयातील तालुका व गाव पातळीवर असलेल्या रुग्णालयांनी फायर एनओसी घेतलेली नसल्याचे समोर आले आहे.

भंडारा घटनेनंतर राज्य सरकारने तातडीने राज्यातील सर्व बाल रुग्णालयांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिकल आणि फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी तातडीने अग्निशमन विभागाला शहरासह जिल्हयातील रुग्णालयांच्या अग्नीरोधक यंत्रणेची तपासणी करुन त्यांना फायर एनओसी देण्याचे आदेश दिले आहे.

केवळ 25 टक्के खासगी रुग्णालयांनाच एनओसी ? शशहरात 526 खासगी रुग्णालये व 45 बाल रुग्णालये अशा एकूण 571 रूग्णालयांना मनपाच्या आरोग्य विभागाने परवानगी दिलेली आहे. मात्र यातील किती रूग्णालयांनी फायर एनओसी घेतलेली आहे,

याची माहिती घेतली असता 2019 मध्ये केवळ 146 म्हणजेच 25 टक्के रूग्णालयांनी ही एनओसी घेतलेली असल्याचे समोर आले. यातून उर्वरीत 425 रूग्णालयांनी अग्निरोधक यंत्रणा सुस्थितीत असल्याची कागदपत्रे अग्निशमन विभागाला सादर केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here