“त्या” कोरोनामुळे मृत झालेल्या वराच्या वडीला विरूद्ध FIR दाखल…विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या ११३ पाहुण्यांना कोरोनाची झाली लागण…

न्यूज डेस्क – पाटण्यातील पालीगंज येथे विवाह सोहळ्यासाठी आलेल्या ११३ पाहुण्यांना कोरोनाची लागण झाली. या प्रकरणात पाटणा जिल्हा प्रशासनाने मृत वराचे वडील अंबिका चौधरी यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे.

१५ जून रोजी पालीगंजच्या देहपाली गावात झालेल्या या लग्नाच्या दोनच दिवसानंतर वधू अनिल कुमारचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. या लग्नात मृतक अनिल कुमार यांचे वडील अंबिका चौधरी हे ५० वरुन अतिथींनी उपस्थित असल्याचा आरोप आहे आणि यावेळी कोविड -१९ च्या नियमांचे पालन केले गेले नाही.

सविस्तर बातमी खालील लिंक वर

धक्कादायक | लग्नाच्या २ दिवसानंतरच कोरोनामुळे वराचा मृत्यू…लग्नाला जमलेल्या १०० हून अधिक पाहुण्यांचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह..

पाटणा जिल्हा प्रशासनाने केलेल्या तपासणी दरम्यान पाहुण्यांनी या लग्नात मास्क वापरलेले नाहीत याची खात्री पटली. याशिवाय सामाजिक अंतर निर्माण करण्याच्या नियमांचेही पालन केले नाही.

नियमांचे पालन न केल्यामुळे या लग्नाला आलेल्या ११३ पाहुण्यांनाही संसर्ग झाल्याचे तपासात समोर आले आहे. कोरोना कालावधीत बिहारमधील ही पहिली घटना आहे,

जिथे एका कार्यक्रमात उपस्थित ११३ अतिथींवर कोरोणाचा प्रभाव झाला.या संदर्भात पालीगंजचे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर चिरंजीवी पांडे यांनी अंबिका चौधरी यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे.अशी माहिती दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here