कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई…कोण आहेत बोम्मई?…जाणून घ्या

न्यूज डेस्क – बसवराज बोम्मई कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असतील. बसवराज बोम्मई याचं वय 61 वर्ष, यांचा जन्म 28 जानेवारी 1960 रोजी हुबळी येथे झाला. कर्नाटकच माजी मुख्यमंत्री एसआर बोम्माई यांचा मुलगा बसवराज कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचा मोठे आहेत. त्यांनी 1982 मध्ये भुमरडी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातून बी.ई. डिग्री घेतली. या वर्षाच्या सुरुवातीला बसवराज बोम्मई यांना कर्नाटकचे गृहमंत्री केले गेले. ते 2004 ते 2008 पर्यंत कर्नाटक विधानसभेचे सदस्यही होते.

कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे पूर्ण नाव बसवराज सोमप्पा बोम्माई आहे. कर्नाटकचे गृहनिर्माण, कायदा, संसदीय कार्यमंत्री असलेले बोम्माई यांनी हवेरी व उडुपी जिल्ह्याचे प्रभारी मंत्री म्हणूनही काम पाहिले. यापूर्वी त्यांनी जलसंपदा व सहकार मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

त्यांचे वडील एसआर बोम्माई हे सुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. त्यांचा मुलगा म्हणून एक वेगळी ओळख आहे. तर बसवराज यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई केले आहे. जनता दलातून त्यांनी राजकीय कारकीर्दीची सुरूवात केली.

1998 आणि 2004 मध्ये धारवाड स्थानिक प्राधिकरण मतदार संघातून बसवराज बोम्मई कर्नाटक विधान परिषदेत दोनदा निवडून आले. 2008 मध्ये त्यांनी जनता दल युनायटेड सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2008 च्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत ते बोम्मा हवेरी जिल्ह्यातील शिगगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.

बीएस येडियुरप्पा यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर बसवराज बोम्मई कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले आहेत.

बसवराज बोम्मई यांना कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला. बेंगळुरू येथील खासगी हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी किशन रेड्डी हे भाजपाचे केंद्रीय निरीक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here