बोदवड खरेदी विक्री संघात आर्थिक गैरव्यवहार…मॅनेजर ची नियुक्ती व मुदतवाढ नियमबाह्य ?…

केलेली तक्रार व्यक्तिद्वेषपोटी तुकाराम राणे मॅनेजर !

बोदवड प्रतिनिधी( गोपीचंद सुरवाडे )बोदवड खरेदी विक्री संघात मॅनेजर पदावर कार्यरत असलेले श्री तुकाराम राणे यांना अनेक दोषरोपासह दि ,१८/०९/२०१९रोजी नोटीस देऊन कार्य मुक्त करण्यात आले होते. त्यात नोटिशीची प्रत संबंधित विभागातील अधिकारी यांना दिल्यानंतर काहीकाळ मॅनेजर पदावरून कमी केले.व अचानक पुन्हा कामावर रुजू करून घेतले ,त्यांच्यावरील दोषरोप मुक्त कसें समजले,किंवा काय सुधारित नियमाद्वारे ही नियुक्ती करण्यात आली.

ही नियमबाह्य आहे, त्यांचा सेवेमधून निवृत्ती काळ संपलेला असतांना सतत त्याना नियुक्ती ,मुदतवाढ देणें नियमबाह्य आहे,तुकाराम राणे यांनी शेतकऱ्यांकडून शासकीय शासकीय दराने मका ,तूर, चना (हरबरा)खरेदी करताना संस्थेला मिळालेले उत्पन्न (कमिशन)मॅनेजर यांनी वेळोवेळी रोख रक्कम काढून खर्ची केल्याचे बँक खाते वरून दिसून येईल ,सहकारी संस्थेचा अशा प्रकारे व्यवहार होणे संशयास्पद असून यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही,

संस्थेचे लेखा परीक्षण व दप्तर ताब्यात घेऊन मॅनेजर यांच्या नियुक्ती सह संस्थेचे कामकाज व आर्थिक व्यवहार याची चौकशी करून दोषींवर उचित कारवाई करण्यात यावी अशी तक्रार जिल्हा दूध संघाचे संचालक मधुकर रामचंद्र राणे यांनी सहायक निबंधक बोदवड यांच्याकडे केली आहे. बोदवड सेल परचेस अर्थात खरेदी विक्री संघ ही संस्था भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे .

एकदोन संचालक वगळले तर सर्व संचालक भारतीय जनता पक्षाचे आहेत संस्थेचा चेअर मन भाजपचा मॅनेजरने सुद्धा निवडणूक काळात भाजपात प्रवेश केला होता,या संस्थेत जर एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हा भ्रष्ट्राचार एकटा मॅनेजर तोही मानधनावर काम करणारा, चेअर मन काय फक्त नामधारी आहे का?एवढा भ्रष्टाचार होत असताना एकही संचलकाने पाच वर्षांत तक्रार का केली नाही.

लेखा परीक्षण झाल्यावर जर अपहार सिद्ध होत असेल तर अनेक ग्राम पंचायत मध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भाजप म्हनजे पारदर्शक पक्ष बारा तेरा संचालक पैकी एकानेही पाच वर्षे तक्रार करू नये ,सभासदाने तक्रार करावी म्हणजे ते संचालक त्या पदाच्या लायक आहेत का?जिल्हा बँकेत जर सेवा निवृत्त कर्मचारी मानधनावर काम करत असेल तर या संस्थेला हा नियम लागू होत नाही का?पाच वर्षे संचालक मंडळ झोपेत होते का?या निमित्तानं प्रश्न उपस्थित केला जात आहे,

दाल में कुछ का ला है!या सब दाल ही काली है!या तक्रारीच्या अनुषंगाने जागृत नागरिकांत असे बोलले जाते की कृषी उत्पन्न बाजार समिती च्या गैर प्रकारची सुद्धा चौकशी करण्यात यावी, मॅनेजर तुकाराम राणे यांना या तक्रारी बाबत विचारले असता त्यांनी सांगितले की ही तक्रार माझ्या वैयक्तिक द्वेषा पोटी दिली आहे,असे आमच्या प्रतिनिधी शी भ्रमणध्वनी वर बोलताना सांगितले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here