अखेर खासदार प्रफुल्ल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मध्यस्थीने 16 दिवसानंतर सरपंच संघटनेचे उपोषण मागे, खासदार प्रफुल्ल पटेल….

खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया जिल्ह्य़ात दिवाळी निमित्त मंडई उत्सव साजरे करण्याची दिली परवानगी…

गोंदिया – राजेश कुमार तायवाडे

दिनांक 21 आँक्टोंबर 2021 पासून ग्राम पंचायत मधील सन २०१८ मधील प्रपत्र ड मधील पात्र सुटलेल्या लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट करणे, आरसीसी असो किवा नसो याची अट घरकुलाकारिता शिथिल करणे,१०० दिवसात घरकुलाचा काम पूर्ण करण्यासाठी रेती उपलब्ध करणे ग्राम पंचायत ठरावावर तात्काळ पंचायत समिती मध्ये दखल घेण्यात यावी,

घरकुल लाभार्थ्याकरिता कवलेवाडा घाटातून रेती पुरवठा करणे, इत्यादी मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात तिरोडा तालुका सरपंच संघटनेतर्फे इंदौराचे सरपंच नितेश खोब्रागडे व कवलेवाडा सरपंच किरण पारधी यांनी पंचायत समिती तिरोडासमोर बेमुदत उपोषणावर बसले असून आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी भंडारा गोंदिया जिल्ह्य़ाचे खासदार प्रफुल्ल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांनी उपोषण स्थळी भेट देऊन सरपंच महोदयांच्या पूर्ण मागण्या शासनाकडे पाठवून पूर्ण करण्यासंदर्भात,

विषेश म्हणजे सद्या दिवाळी निमित्त प्रत्येक गावात सुरू असलेल्या मंडई उत्सव साजरे करण्याची परवानगी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी माजी आमदार राजेंद्र जैन यांना सांगुन सर्व मागण्या तात्काळ शासनाकडे पाठविण्यास सूचित केले व उपोषणकर्त्याला निंबूपाणी पाजून सरपंचांतर्फे उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने राजकुमार एन जैन, डॉ. किशोर पारधी, मनोज डोंगरे, योगेंद्र भगत,, मनोहर राऊत, निता रहांगडाले, देवेंद्रनाथ चौबे, कैलास पटले, सुनिता मडावी, बालु बावनथडे, डॉ. गोवर्धन चव्हाण वाय. टी. कटरे बाबुराव डोमळे रोशन बडगे व तालुक्यातील संघटनेचे सर्व सरपंच उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here